पौड : कोरोना काळात प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीव धोक्यात घालून घरोघरी जाऊन सर्वे करणाऱ्या तसेच स्वतःच्या कुटुंबाबरोबर इतरांच्या आरोग्यासाठी धडपड करणाऱ्या अंगणवाडी सेविका,आशा वर्कर्स खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा आहेत. आज जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे असं गौरवद्दार युवासेना पश्चिम महाराष्ट्र सचिव अविनाश बलकवडे यांनी काढले.
मुळशीत जागतिक महिला दिनानिमित्त अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांना शिवसेना-युवासेना यांच्या वतीने युवासेना विभाग सचिव पश्चिम महाराष्ट्र अविनाश बलकवडे यांच्या आयोजनाखाली सन्मानपत्र व विशेष भेट म्हणून साडी-चोळी देऊन कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले. याप्रसंगी भोर विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद हांडे, पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर,सागर काटकर,संपर्क समन्वयक कैलास मारणे, उपजिल्हा संघटिका कांताताई पांढरे, तालुका प्रमुख सचिन खैरे, तालुका युवा अधिकारी राम गवारे, जेष्ठ शिवसैनिक आबासाहेब शेळके उपस्थित होते.
कोरोना आजाराने देशात थैमान घातले असताना त्यांच्या विरुद्ध लढा देण्यास आरोग्य विभाग पुढाकार घेत असताना त्यांच्या बरोबरीने आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका यांनी ग्राम स्तरावर काम केलं .यांचे शासन दरबारी प्रलंबित मागण्या बाबतीत शिवसेना खंबीरपणे उभी आहे असं प्रतिपादन पुणे जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर यांनी केले.भोर विधानसभा संपर्क प्रमुख मिलिंद हांडे यांनीही कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सहआयोजक असलेले जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर,भोर विधानसभा संपर्क समन्वयक कैलास मारणे, शिव सहकार सेनेचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,तालुका समन्वयक हनुमंत सुर्वे, भांबर्डे सरपंच सुनील वायकर यांनी प्रयत्न केले.यावेळी महिला आघाडी पुणे जिल्हा उपसंघटिका कांताताई पांढरे,युवासेना जिल्हा समन्वयक वैभव शितोळे,युवासेना तालुका अधिकारी राम गवारे,वेल्हा तालुका प्रमुख दीपक दामगुडे,बाल विकास प्रकल्प अधिकारी धनराज गिरम,तालुका संघटक गोविंद सरुसे,जेष्ठ नेते अर्जुन पाठारे,तालुका वाहतूक सेनेचे शैलेश पांढरे,मा.उपसभापती सारिका मांडेकर,सुचेता बलकवडे,गटप्रवर्तक सुनिता कार्ले, स्वरूपा शेळके,सुपरवायझर संध्या विश्वासराव,नलिनी शिंदे, संजीवनी पानसरे ,हिराताई पडळघरे,सुप्रिया सरुसे, उपतालुकाप्रमुख अनंता वाशिवले,युवासेना भोर शहर अधिकारी सुशील तारू,दत्ता गोरे,विभाग प्रमुख शिवाजी बलकवडे,दत्ता पाठारे,भरत गाउडसे,तानाजी दिघे,शांताराम साठे,अमोल ढमाले,पंकज धिडे, नारायण धिडे,मारुती धनवे,बाळू जोरी,राजेंद्र सातपुते,यश पिंगळे,रोहिदास दुर्गे,चिंतामण सातपुते,मयुर रानवडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत सुर्वे केले तर आभार आशा लांडगे यांनी मानले.