logo
add image
add image
Blog single photo

भुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा


पिरंगुट : भुगाव ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी महिलांसाठी विविध उपक्रमांबरोबर विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. 

               यावेळी महिलांसाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय, हक्काना मान्यता देण्यासाठी ८ मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्ताने ग्रामपंचायत मार्फत १०% महिला  बालकल्याण, ग्रामनिधी व १५ व्या वित्त आयोग निधीतून महिलांसाठी अभिनव उपक्रम घेण्यात आले. यात पती,पत्नी यांची संयुक्त नावे मिळकत घराच्या नोंदी लावण्यात आले. माझी वसुंधरा शपत घेण्यात आली. महिला व युवतींसाठी स्वयंरोजगार उद्योगाकरता १५ वित्त आयोगातुन हात विणकाम प्रशिक्षणाचा  शुभारंभ करण्यात आला. आर्थिक दृष्ट्या दुर्बल व निराधार १० महिलांना १०,००० रू धनादेश देण्यात आला.सन २०२०-२१ मध्ये जन्मलेल्या १० मुलींचे त्यांच्या मातांचे ५००० रू धनादेश देऊन स्त्री जन्माचे स्वागत करण्यात आले.१८ वर्षांपासून महिलांना२ व्हिलर व ४ व्हिलरचे लर्निंग लायसन्स देण्यासाठी अर्ज  घेण्यात आले.

              या वेळी जिल्हा परिषद शाळेतीलशिक्षिका सविता पवार, मनिषा मारणे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा विशेष  सन्मान करण्यात आला. महिला पोलीस हवालदार अनिता रवळेकर, कोरोना काळात आरोग्य सेविकांनी काम केल्या बद्दल कल्पना खडके, मोहिनी साखरे या दोघींचा सन्मान करण्यात आला. अंगणवाडी सेविका अंजली शेडगे, क्रिडा क्षेत्रातील खेळाडू  हिमानी चोंधे ( रायफल शूटिंग) व मृगनयनी शिंदे (स्केटिंग) या मुलींचा सन्मान करण्यात आला. 

              कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक शालन कडु, शिक्षण अधिकारी संध्या गायकवाड, गटविकास अधिकारी संदिप जठार, विस्तार अधिकारी एम. मोमीन, सरपंच निकीता सणस, उपसरपंच अर्चना सुर्वे, माजी उपसरपंच वैशाली सणस, सुरेखा शेडगे, सुनीता पोळ, सदस्य वनिता तांगडे, योगेश्री शेडगे, माजी उपसरपंच विशाल भिलारे, सदस्य कालिदास शेडगे, योगेश चोंधे, अमित घारे, संकेत कांबळे, ग्रामविकास अधिकारी मदन शेलार, तंटामुक्त अध्यक्ष गुलाब चोंधे, उपाध्यक्ष अरूण साळुंके,आंदगांव केंद्र प्रमुख भोये मँडम शाळेतील मुली व शिक्षक ग्रामस्थ महिला बरेच संख्येने उपस्थित होते.

               कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी उपसरपंच वैशाली सणस यांनी केले.

add image
add image

Leave Comments

Top