पौड : महाराष्ट्र निर्माण सेने तर्फे कोथरूड मध्ये "मी मराठी.. स्वाक्षरी मराठी." हा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा केला जातो. महाराष्ट्र नविर्माण सेने तर्फे कोथरूड मध्ये "मी मराठी.. स्वाक्षरी मराठी.." हा उपक्रम साजरा करण्यात आला. या उपक्रमाला नागरिकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्र साहित्य सृष्टीत मोलाचे असे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. आपल्या मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' कोथरूड मध्ये साजरा करण्यात आला.
यावेळी ॲड गणेश सातपुते, रणजीत शिरोळे, योगेश खैरे, किशोर शिंदे, संतोष पाटील, सुहास निम्हण, सुधीर धावडे, राजेंद्र वेडे आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन मनसे उपविभाग अध्यक्ष रमेश उभे , शाखाध्यक्ष विराज डकवे, सागर भगत, किरण उभे, किरण जाधव, बाळा शिंदे, चेतन चव्हाण, शुभम चोरगे,रमेश खैरे, सुभाष डांगी, अमित मोहोळ, दिपक गावडे, प्रतीक कंधारे, आकाश मोरे, शैलेश सोनटक्के, अजिंक्य खळदकर, मंगेश गावडे, केतन कडू, पै.गणेश शिंदे, राकेश आठवले, सचिन चव्हण,कुणाल ढमाले तसेच मनसे चे इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.