पौड : आबासाहेब शेळके मित्र मंडळ व बिइंग व्हालेंटीअर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कासार आंबोली व शिंदेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरामध्ये १८४ रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली .
या शिबिरात रुग्णांची कान-नाक-घसा तसेच हिमोग्लोबीन व रक्तदाब व मधुमेह तपासणी करण्यात आली . कासारआंबोली येथील पद्मावती मंदिरामध्ये या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .तसेच अंबडवेट ग्रामपंचायत हद्दीतील शिंदेवाडी ,रावडेवाडी, गडदावणे या गावांसाठी घेण्यात आलेले आरोग्य शिबिर शिंदेवाडी याठिकाणी संपन्न झाले. शिबिराचे नियोजन आशुतोष शिरोलकर,शाकीर शेख,सोमनाथ शिंदे,शशिकांत चवरे ,आशाताई लांडगे ,छायाताई भिलारे ,आशा स्वयंसेविका ववले ताई, सौरभ साळुंके यांनी केले. आरोग्य तपासणी नंतर रुग्णांना त्यांचे हेल्थ कार्ड देण्यात येणार असून त्याचा उपयोग रुग्णांना त्यांच्या पुढील उपचारासाठी होणार असून श्रवण दोष असलेल्या रुग्णांना अल्पदरात श्रवण यंत्र उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती माधवराव शेळके यांनी दिली.
शिबिर प्रसंगी बिइंग व्हालेटिअर्स व सेवा इंटरनॅशनलच्या वतीने महिलांना सॅनिटरी नॅपकिनचे मोफत वाटप करण्यात आले व आरोग्यविषयक माहिती देण्यात आली.पुढील काळात तालुक्यातील विविध गावांमध्ये अशाप्रकारची आरोग्य शिबीरे घेऊन गरजू नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती आबासाहेब शेळके मंडळाचे कार्याध्यक्ष शाकिर शेख यांनी दिली.