logo
add image
add image
Blog single photo

लवार्डे गावच्या सरपंच पदी स्वाती गुंड यांची बिनविरोध निवड.


पिरंगूट : लवार्डे  ( ता.मुळशी)  गावच्या सरपंच पदी स्वाती विश्र्वास गुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. गेल्या कित्येक पिढ्यांपासुन बिनविरोधची परंपरा कायम ठेवत ग्रामस्थांनी तालुक्याला गावाची एकजूट दाखवुन दिली आहे.

           आधीचे सरपंच अस्मिता मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. सरपंच पदासाठी स्वाती गुंड यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध सरपंच म्हणुन निवड झाली. 

          यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून मुठा विभाग सर्कल उर्मिला गुंड, तलाठी पवार, ग्रामसेवक स्वप्निल रासकर यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच अनुसया उभे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब वाल्हेकर, संतोष जाणू बावधने, संतोष धोंडिबा बावधने, मंगल कोळी, सुभद्रा हिलम उपस्थित होते.  

             यावेळी बिनविरोध निवडून आलेले सरपंच स्वाती गुंड यांचा सत्कार ग्रामस्थांच्या वतीने मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी सभापती महादेव आण्णा कोंढरे, माजी सरपंच अशोक चवले, शिवाजी चवले, बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब चवले, सुभाष पवळे, निलेश चवले, दत्तात्रय सुतार, कैलास चवले, सागर गुंड, विकास मारणे, भुषण कांबळे, प्रकाश मारणे, धनंजय पासलकर, वसंत काटकर सदाशिव उभे, बाळासाहेब जांभेकर असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. 

add image
add image

Leave Comments

Top