logo
add image
add image
Blog single photo

युवासेनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय सचिवपदी आविनाश बलकवडे


पौड : मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेच्या पुणे, सातारा,सांगली,कोल्हापूर जिल्ह्यांच्या विभागीय सचिव पदी आविनाश बलकवडे यांची निवड केली आहे.

      अविनाश बलकवडे यांनी युवासेना पुणे जिल्हा अधिकारी(भोर, वेल्हा, मुळशी) माध्यमातून ऑक्टोबर २०१७ पासून युवासेनेची धुरां सांभाळली होती. युवासेना पुणे जिल्हा अधिकारी म्हणून निवड झाल्यानंतरच्या पहिल्या दिवसापांसून त्यांनी कामांचा धडाका सुरु करून कार्यकर्त्यांमध्ये नव चैतन्य निर्माण करून संघटनेला उभारी दिली. शिवसेनेतील अभ्यासू नेतृत्व म्हणून अविनाश बलकवडे यांची ओळख आहे.

        मागील दोन वर्षांपासून कोरोना काळात अनेकांना हॉस्पिटलमध्ये  बेड उपलब्ध करून दिले.सर्वसामान्य लोकांना सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी  आदित्य जनसेवा रथाच्या माध्यमातून शासन आपल्या दारी ठाकरे सरकार घरोघरी अंतर्गत आत्तापर्यंत ४००० कुटुंबाला विविध शासकीय  योजनांचा लाभ मिळवून दिला.मोफत आरोग्य शिबीर घेऊन विविध आजारांच्या १५० हुन अधिक मोफत शस्रक्रियां करून दिल्या.मुळशी तालुक्यासाठी अग्निशामक दल,परीक्षा केंद्र असे अनेक प्रश्न मार्गी लावले.भविष्यात लवकरच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार आहे.

    याच कामाची दखल घेऊन शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी पुणे, सातारा, सांगली ,कोल्हापूर या जिल्ह्यांसाठी विभागीय सचिव पदी संधी दिली.विभागीय सचिव म्हणून  येणाऱ्या काळात पक्ष नेतृत्वाने दिलेल्या संधीचे सोने करेन.माझ्यावर विश्वास दाखवून मला नवीन जबाबदारी दिल्याबद्दल पक्षप्रमुख मा.उद्धवज ठाकरे साहेब, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे,शिवसेना सचिव सूरज चव्हाण, युवासेना मुख्य सचिव वरूनज सरदेसाई, अमोल कीर्तिकर,सचिन अहिर, रवींद्र मिर्लेकर ,आणि सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांनी अविनाश बलकवडे यांचे अभिनंदन केले आहे.

add image
add image

Leave Comments

Top