logo
add image
add image
Blog single photo

अरिहंत महाविद्यालयात 'मराठी भाषा संवर्धन पंधरवडा' साजरा


बावधन : मराठी भाषेचे वैभव जोपासण्यासाठी, तिचे महत्त्व समजण्यासाठी,तिचा प्रसार करण्यासाठी अरिहंत एज्युकेशन फाऊंडेशनचे अरिहंत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय बावधन येथे ' मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ' अंतर्गत आयोजित ऑनलाईन ज्ञानोदय उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

अरिहंत एज्युकेशन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक मा.डॉ.भूषण पाटील, प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वडजे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. दुर्गा दगडे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.

मकर संक्रातीपासून या उपक्रमाला सुरूवात करून निबंधलेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, व्याख्यानमाला, काव्यवाचनस्पर्धा, भित्तिपत्रिका, चित्रकला स्पर्धा, शाब्दिक खेळ व कोडी, कथाकथन, अंताक्षरी अशा वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करून शेवट भव्य अशा ग्रंथदिंडीने करण्यात आला. या ग्रंथदिंडीनंतर महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी आणलेली मराठी भाषेतील पुस्तके/साहित्य ग्रंथालयास भेट म्हणून देण्यात आली.

१४ जानेवारी ते २८जानेवारी या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने उपक्रम असताना देखील महाविद्यालयातील सर्व शाखेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला होता. तसेच हा पंधरवडा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

add image
add image

Leave Comments

Top