logo
add image
add image
Blog single photo

सत्याने काम करणारा माणूस जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदी : राजेंद्र बांदल


पिरंगूट : मुळशी तालुक्यामध्ये सत्याने काम करणारा माणूस पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्ष पदी विराजमान झालेला आहे. असे प्रतिपादन चैतन्य विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल यांनी भूकुम येथे केले.

       पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर  उपाध्यक्षपदी निवड झालेले सुनील चांदेरे यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बांदल बोलत होते. ते पुढे म्हणाले की एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील कार्यकर्ता हा जिल्हा बँकेचा उपाध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्याकडून मुळशी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबांना खूप मोठी अपेक्षा आहे.

      सुनील चांदेरे यांचा भुकूम येथील माजी आदर्श सरपंच नामदेव अण्णा माझिरे आणि ग्रामस्थांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

     या सत्काराला उत्तर देताना सुनील चांदेरे म्हणाले की तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी मोलाची साथ दिली आहे आणि धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही नेहमीच ताकतवान असते हेच या वेळी सिद्ध झालेले आहे.

       यावेळी चैतन्य विद्या प्रतिष्ठान चे संस्थापक - अध्यक्ष राजेंद्र बांदल, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, शिवसेना बारामती लोकसभेच्या संघटिका स्वाती ढमाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती दगडू काका करंजावणे, राम गायकवाड,सरपंच रेखा वाघ, उपसरपंच सचिन हगवणे , सचिन आंग्रे, अंकुश खाटपे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलीप चोरघे, ज्योतिबा देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजय हगवणे, कालिदास गुजर, तुषार माझीरे, प्रसाद भरतवंश , शंकर हगवणे, रामभाऊ माझीरे,विशाल हगवणे, काशिनाथ माझिरे, योगेश सोनवणे, सुभाष माझीरे, भानुदास पानसरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार येथील सामाजिक कार्यकर्ते आनंदा हगवणे यांनी मानले.

add image
add image

Leave Comments

Top