मुळशी: भूगाव ग्रामपंचायतीच्या वार्ड क्र ३ मधील एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहिर झाली असुन यांत भूगाव येथील तरुण कार्यकर्ते कालिदास विठ्ठल शेडगे यांनी अर्ज दाखल केला आहे. शेडगे यांचे नारळ या चिन्ह असुन प्रचाराचा शुभारंभ दि. ७ जानेवारी रोजी भूगाव येथील पद्मावती मंदीरात केला गेला. मंगळवार दि. १८ जानेवारी रोजी भूगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदान होणार आहे. यावेळी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे तसेच गावातील अनेक नागरिकांसह मान्यवर उपस्थित होते.
समाजकार्यात कालिदास शेडगे हे नेहमी अग्रेसर रहात असुन या निवडणुकीत सामान्य कार्यकर्त्याला न्याय मिळाला पाहिजे. कालिदास शेडगे हे गावाच्या विकासासाठी नेहमी प्रयत्नशिल असुन लोक कल्याणासाठी व भूगावच्या विकासासाठी त्यांना बहुमतांनी निवडुन द्यावे. असे मत यावेळी जिल्हा परिषदेचे मा. उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे यांनी व्यक्त केले.