भुगांव : पञकार दिनाचे औचित्य साधत हिमालय नागरी सहकारी पतसंस्था व सोनेरी मुळशी दिनदर्शिकेचे प्रकाशन हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी भाऊसाहेब ढोले आणि पौड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले.
भुगाव येथील क्लीफ हाँटेल येथे झालेल्या मुळशी तालुका पञकार संघाच्या कार्यक्रमावेळी या दोन्ही दिनदर्शिकेंचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा बँकेचे संचालक सुनिल चांदेरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, पेरिविंकल स्कूल व हिमालय नागरी सहकारी पंतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले,दगडूकाका करंजावणे, मुळशी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे, सरपंच निकीता सणस,रेखा वाघ, पञकार बंडू दातीर, जितेंद्र गोळे, राम गायकवाड,दिपक सोनवणे, विजय वरखडे, गोरख माझिरे, प्रविण सातव, तेजस जोगावडे, गणेश अभिमाने, रामदास मानकर, जितेंद्र इंगवले, दिपक आबा करंजावणे,संतोष पवळे, अक्षय सातपुते उपस्थित होते.