logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे मोबाईल ॲप लॉन्च


पौड : कोरोना काळात मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेने भरीव अशी मदत केली आहे. सभासद हित जोपासणारी, सभासदांच्या अडीअडचणी सोडवणारी पतसंस्था म्हणून या पतसंस्थेचा नावलौकिक असल्याचे प्रतिपादन मुळशीचे गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी केले.

           मुळशी तालुक्यातील सतत ऑडिट वर्ग 'अ' असणारी प्राथमिक शिक्षकांची पतसंस्था ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यानंतर मोबाईल बँकिंग ॲप वापरणारी मुळशी तालुक्यातील पहिली पतसंस्था होण्याचा मान या संस्थेने मिळविला आहे. संस्थेच्या सर्व सभासदांना उपयुक्त असे मोबाईल बँकिंग ॲपचे पौड येथे नुकतेच लॉन्चिंग करण्यात आले. याद्वारे सभासदांना त्यांचा अद्ययावत हिशोब पाहता यावा, तसेच सहज कर्ज, व्याज यासंबंधी सविस्तर माहिती मिळण्यासाठी हे या उपयुक्त ठरणार आहे. 

          मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष  महादेव कोंढरे म्हणाले, "मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था ही तालुक्यातील एक अग्रगण्य पतसंस्था आहे. ही  संस्था राष्ट्रीय कामातही नेहमीच आपला वाटा उचलते.

          तसेच संस्थेचे माजी चेअरमन, शिक्षक संघाचे विद्यमान तालुकाध्यक्ष शहाजी मारणे  यांनी पतसंस्थेच्या गौरवशाली कार्याचा उल्लेख केला. प्रास्ताविकात ते म्हणाले की"अगदी सुरुवातीला २ रुपये वर्गणी व १२० रुपये कर्ज दिले जात होते. आता २००० रुपये वर्गणी व १५,००,०००रुपये कर्ज दिले जात आहे. संस्थेच्या सहकार्याने शिक्षक सभासदांच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत. सभासदांच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, आकस्मिक आलेल्या संकटांच्या वेळी सभासदांच्या कुटुंबाला पतसंस्थेची खूप मदत झाली आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या काळात पतसंस्था आपला मदतीचा खारीचा वाटा नेहमीच उचलत असते." 

         या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी सचिन लोखंडे यांची बदली झाल्याने त्यांचा मुळशी तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात प्राथमिक शिक्षक संघाकडून पंचायत समिती मुळशी शिक्षण विभागास एक प्रिंटर देण्यात आला.

         यावेळी गटविकास अधिकारी संदीप जठार, मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, सागर काटकर,उपसभापती विजय केदारी, शांताराम इंगवले, सहाय्यक गटविकास अधिकारी ढमाळ, गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, विस्ताराधिकारी सचिन लोखंडे, अंकुश मारणे, शशिकांत मोरे, सतीश सुतार, तालुकाध्यक्ष शहाजी मारणे, चेअरमन रियाज शेख, रवींद्र चौधरी, सुनीता पवार, हरिभाऊ वाघुलकर, किसन गोरे, शिवाजी चवले, अविनाश टेमघरे, आदिनाथ बोरकर, संतोष गावडे, राहुल लोंढे, यशवंत पासलकर, मंगल मारणे,राजेंद्र भरम, विजय भरम, मधुकर येनपुरे, संजय मारणे, राजेंद्र जाधव, संजय रायरीकर, रामभाऊ झोरे, जयवंत खुडे आदि मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष गावडे यांनी केले.

add image
add image

Leave Comments

Top