logo
add image
add image
Blog single photo

कासारआंबोलीत २५ लाभार्थ्यांना ५% दिव्यांग निधीचे वाटप


पिरंगूट : जागतिक अपंग दिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायत कासार आंबोली ( ता.मुळशी ) वतीने गावातील २५ लाभार्थ्यांना  ५% दिव्यांग निधीचे वाटप सरपंच सचिन धुमाळ यांच्या हस्ते करण्यात आले .
       यावेळी शिवसेना नेते नानासाहेब शिंदे, कृषि उत्पन्न बाजार समितीचे सदस्य सुनील वाडकर,रामभाऊ गायकवाड,माजी सरपंच राजाभाऊ मारणे,उपसरपंच सुवर्णा मारणे,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल शिंदे,रंजित गायकवाड, उमेश सुतार, शंकर सुतार, रेश्मा गायकवाड,प्रिती शिंदे, माधुरी धुमाळ,छाया भिलारे,पुजा सुतार,नेहा सुतार, सागर धुमाळ,सुनिल शिंदे,चेतन सुतार, ग्रामविकास अधिकारी प्रताप माने,आशा लांडगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top