पौड : कोरोना काळातही स्वाती ढमाले यांनी किर्तनाचे आयोजन केले हे त्यांचे मोठे कार्य आहे. पुणे जिल्ह्यात अनेक विव्दान झाले. वारकरी संप्रादयाची खान पुणे जिल्हा असून ज्ञानेश्वरीच्या तोडीचा ग्रंथ झाला नाही. स्व.बाळासाहेब ठाकरेची जागा फोटोत नसून शिवसैनिकांच्या हृदयात आहे.मुलांना शिकण्यासाठी मदत करणे हे स्वाती ढमालेचे कार्य महान आहे.त्याग आहे म्हणून धर्म आहे असे मत समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांनी चाले तालुका मुळशी येथे व्यक्त केले.
शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त समाजप्रबोधनकार ह.भ.प निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांच्या किर्तनाचे आयोजन चाले येथील सुभद्रा लाँन्स येथे शिवसेना महिला आघाडीच्या माजी संघटिका व म्हाडाच्या संचालिका सौ. स्वाती ढमाले यांनी केले होते.यावेळी इंदुरीकर महाराज यांचे विचार ऐकण्यासाठी तालुक्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
यावेळी शिवसेना उपनेते रविद्र मिर्लेकर,शिवसेना पुणे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर,माजी संपर्कप्रमुख सत्यवान उभे, शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब चांदेरे,रमेश कोंडे,महेश पासलकर,भोर विधानसभा अध्यक्ष प्रकाश भेगडे,विधानसभा संपर्कप्रमुख मिलिंद हांडे,माजी सभापती कोमल वाशिवले,माजी उपसभापती सारीका मांडेकर, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिलीप आण्णा दगडे,मुळशी तालुका पञकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे,राष्ट्रवादी काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सुनिल चांदेरे, शिवसेना महिला आघाडी संघटिका ज्योती चांदेरे,जेष्ठ नेते आबासाहेब शेळके,शिवसहकार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ, कैलास मारणे, रविकांत धुमाळ,हनुमंत सुर्वे,सविता बलकवडे,कस्तुरी पाटील,संपतराव ढमाले,दिपक करंजावणे, जितेंद्र इंगवले, अमोल मोकाशी,राहूल दुधाळे, वैभव पवळे, दत्ता झोरे, कालीदास शेडगे, मोहन शिंदे,शिवाजी बलकवडे,लहू लायगुडे,गणेश भोयणे,शिवाजी उभे, राणी शिंदे, उर्मिला शिंदे, संभाजी ढमाले तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूञसंचलन स्वप्नील तापकीर यांनी केले.