logo
add image
add image
Blog single photo

वरसगांव धरणात बुडालेल्या दोघांचे मृतदेह १९ तासानंतर बाहेर काढण्यात मुळशी आपत्ती व्यवस्थापनला यश.


पिरंगुट : वरसगांव धरणात लवासा - पडळघर जवळ पाण्यात बुडालेल्या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह मुळशी आपत्ती व्यवस्थापन टिमला १९ तासाच्या अथक प्रयत्नानंतर शोधून काढण्यात यश आले आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार, रविवार ( दि.१४ ) रोजी दुपारी तीनच्या दरम्यान लावासा येथील क्राइस्ट युनिव्हर्सिटी येथील बीएससी सेकंड इयर मध्ये शिकणारे विद्यार्थी १)निहाल उत्तम थापा ( वय २१ रा. शिलॉंग,मेघालय) आणि २) सीरक्षीत चंद्रमोली स्वरम ( वय २० रा चेन्नई ) हे व अजून दोन मिञ पोहण्यासाठी धरणाजवळ गेले होते. यामध्ये निहाल व सीरक्षीत पाण्यात बुडले होते.घटनेची माहिती पौड पोलिसांना मिळाल्यानंतर  पोलीस नाईक रविंद्र नागटिळक आणि लावासा लाइफ गार्ड विजयकुमार कांबळे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे,विजय शिवतारे आणि टिमने सदर व्यक्तीचा शोध घेतला असताना १९  तासानंतर शोध मोहिमेला यश आले असून आज सकाळी दोघांचे मृतदेह मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीला मिळून आले. बुडालेल्या व्यक्तीची तहसिलदार अभय चव्हाण यांनी माहिती घेतली तसेच घटनास्थळावर पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी मृतदेह शोधमोहित सहभाग घेतला.

add image
add image

Leave Comments

Top