पिरंगुट : तळागाळातील गोर-गरीबांच्या आरोग्यासाठी संघटनेला अपेक्षित असलेलं काम युवासेना पुणे जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे उत्कृष्टपणे पार पाडत आहेत.याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटत असल्याच प्रतिपादन शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी पिरंगूट ( ता.मुळशी ) येथे केले.
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या आयोजनाखाली शासन आपल्या दारी ठाकरे सरकार घरोघरी अंतर्गत आदित्य जनसेवा रथ भाग -२ मध्ये पुण्यातील २० नामांकित हॉस्पिटलच्या सहभागातून मोफत आरोग्य तपासणी व शस्रक्रिया शिबिर पिरंगुट येथे पार पडले..या शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा शिवसेना उपनेते/ संपर्कप्रमुख सचिन अहिर,युवासेना राज्य विस्तारक गणेश कवडे , पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे,पुणे जिल्हा महिला संघटिका संगीता पवळे,तालुकाप्रमुख सचिन खैरे यांच्या हस्ते करण्यात आले.
या आरोग्य शिबिरात पुणे शहरातील २० हॉस्पिटलच्या सहभागातून प्रामुख्याने नेत्ररोग,हृदययातील छिद्र,अँन्जीओप्लास्टी,हृदयरोग, कर्करोग, केमोथेरपी, मुत्रविकार व शस्त्रक्रिया, किडनी विकार व प्रत्यरोपण, मणक्याचे आजार, अस्थमा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, हाडंच्या ठराविक शस्त्रक्रिया,जनरल सर्जरी, स्त्रियांचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, मेंदूविकार व शस्त्रक्रिया, कान -नाक -घसा वर उपचार,फाटलेले टाळू व ओठांवरीन शस्त्रक्रिया, गुडघे प्रत्यरोपण, रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तगट, रक्त शुक्रा, इसीजी,सर्व प्रकारच्या तपासण्या व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तपासणी -चाचणी, औषध उपचार आणि मोफत शस्रक्रियांची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती.
या शिबिरात जवळपास १२६६ शिबिरार्थीनी सहभाग नोंदवला.विविध आजारावर तज्ञ डॉक्टरांकडून तपासण्या करून औषधउपचार करण्यात आले.नेत्र रोगाशी संबंधित रुग्णांना तपासणी झाल्यानंतर चष्म्ये वाटत करण्यात आले. विविध आजाराच्या ज्या रुग्णांना तपासणी नंतर शस्रक्रियेची गरज आहे अश्या जवळपास १५० रुग्णांच्या सर्व शस्रक्रिया मोफत लवकरच होणार असल्याचे शिबिराचे मुख्य आयोजक अविनाश बलकवडे यांनी सांगितले. या शिबिरांमध्ये विशेष उपस्थिती महिला व जेष्ठ नागरिकांची उल्लेखनिय होती.
या शिबिराचे मुख्य आयोजक युवसेना जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हाधिकारी संतोष तोंडे, नागेश साखरे,जिल्हा समन्वयक वैभव शितोळे,मयूर भांडे,तालुका आधिकारी राम गवारे,दत्ता झोरे,तालुका संघटक संकेत दळवी,उपतालुकाधिकारी शुभम साखरे,तालुका सचिव रणजित टेमघरे,प्रसिद्धी आधिकारी मारुती ढेबे,अक्षय शिंदे यांनी शिबीर संपन्न करण्यात योगदान दिले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ,जिल्हा वैद्यकीय कक्षाचे राजाभाऊ भिलारे,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, म्हाडाच्या संचालिका स्वाती ढमाले,आमोल पांगारे,कैलास मारणे,ज्ञानेश्वर डफळ,गणेश भोईने, दीपक आबा करंजावणे, रविकांत धुमाळ,सूर्यकांत साखरे,जेष्ठ शिवसैनिक आबासाहेब शेळके, नामदेव टेमघरे,नवनाथ भेगडे, हनुमंत सुर्वे,अनिल अधवडे, श्रीराम वायकर,वैभव पवळे आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.
शासन आपल्या दारी ठाकरे सरकार घरोघरी अंतर्गत आदित्य जनसेवा रथ भाग-१ च्या माध्यमातून शासकीय योजना आणि कामे याचा लाभ गावोगावी शिबीरे येऊन थेट लाभार्थ्यांना पोहोचवत असताना मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने आरोग्य सेवेसाठी आदित्य जनसेवा रथ भाग २ रा सुरु करावा अशी प्रेरणा मिळाली. यापुढील कालावधीत लोकांसाठी विविध शस्रक्रिया अनेक सरकारी योजनेतून मोफत अथवा कमीत-कमी खर्चात होण्यासाठी काम करणार असल्याचे पुणे जिल्हा युवासेना अधिकारी अविनाश बलकवडे यांनी सांगितले.