पिरंगूट : हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शासन आपल्या दारी ठाकरे सरकार घरोघरी भाग-२ अंतर्गत रविवार दिनांक २१/११/२०२१ रोजी सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत *पुण्यातील जवळपास २० पेक्षा अधिक नामांकित हॉस्पिटलच्या सहभागातून विनामूल्य आरोग्य तपासणी व शस्रक्रिया शिबिराचे आयोजन इंग्लिश स्कूल पिरंगुट येथे करण्यात आले असल्याची माहिती युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे यांनी दिली आहे.
या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना उपनेते/संपर्कप्रमुख पुणे जिल्हा सचिन अहिर व राज्य विस्तारक युवासेना पुणे जिल्हा गणेश कवडे यांच्या हस्ते होणार असून शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,माजी जिल्हा परिषद सदस्य कुलदीप कोंडे,पुणे जिल्हा महिला आघाडी संघटीका संगिता पवळे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरै उपस्थित राहणार आहेत.
या आरोग्य शिबिरात नेत्ररोग,हृदययातील छिद्र, अँन्जीओप्लास्टी,हृदयरोग, कर्करोग, केमोथेरपी, मुत्रविकार व शस्त्रक्रिया, किडनी विकार व प्रत्यरोपण, मणक्याचे आजार, अस्थमा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, मधुमेह, हाडंच्या ठराविक शस्त्रक्रिया,जनरल सर्जरी, स्त्रियांचे आजार, हर्निया, अपेंडिक्स, मेंदूविकार व शस्त्रक्रिया, कान -नाक -घसा वर उपचार,फाटलेले टाळू व ओठांवरीन शस्त्रक्रिया, गुडघे प्रत्यरोपण, रक्तदाब, हिमोग्लोबिन, रक्तगट, रक्त शुक्रा, इसीजी, तपासणी होणार व सर्व प्रकारच्या होणार व तज्ञ डॉक्टरांचा सल्ला, तपासणी -चाचणी, औषध उपचार आणि मोफत शस्रक्रिया होणार आहेत.
या शिबीराचे आयोजन युवासेना पुणे जिल्हा अधिकारी अविनाश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाधिकारी
संतोष तोंडे, नागेश साखरे, जिल्हा समन्वयक वैभव शितोळे, जिल्हा संघटक मयूर भांडे,तालुका अधिकारी राम गवारे ,दत्ता झोरे ,तालुका संघटक संकेत दळवी, तालुका सचिव रणजित टेमघरे, प्रसिद्धी अधिकारी मारुती ढेबे,अक्षय शिंदे यांनी केले आहे.