logo
add image
add image
Blog single photo

पिरंगूट येथे रस्त्याच्या बाजूला असलेली अतिक्रमणे काढण्यास सुरूवात


पिरंगूट : पुणे - कोलाड महामार्गावरील पिरंगूट येथील रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून काढण्यास सुरूवात झाली असून रस्त्याच्या कडेला असलेली अतिक्रमणे पहिल्यांदाच काढण्यात आलेली आहे.दोन्ही बाजूचा रस्ता रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूला दहा मीटर होणार आहे.

          चांदणी चौक ते दिघी बंदर या होत असलेल्या महामार्गाचे काम अनेक ठिकाणी पूर्ण होत आलेले असून सध्या सुतारवाडी ते लवळे फाटा हा रस्ता बाकी राहिलेला आहे. परंतु भुगांव,पिरंगूट व पौड येथे रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असून हि अतिक्रमणे काढण्यास आज पिरंगूट येथून सुरूवात झाली आहे. आज लवळे फाटा ते घोटावडे फाटा या मार्गावरील पौडच्या बाजूला जाणारी बाजू मोकळी करण्यात आलेली असून उद्या दुसरी बाजू मोकळी करण्यात येणार आहे.गेली अनेक वेळा जागा मालकाला अतिक्रमणे काढण्याकरीता नोटीस देण्यात आलेल्या होत्या.माञ आज कोणतीही सूचना न देता थेट गँस कटर व जेसीबीने सहाय्याने होर्डिंग,बोर्ड व भिंती तोडण्यास सुरूवात झाली.

add image
add image

Leave Comments

Top