पिरंगूट : मुळशी तालुक्यातील शिवशक्ती चौक घोटवडे फाटा येथे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करून व त्यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून स्मृतिदिन साजरा करण्यात आला. ज्येष्ठ शिवसैनिक विष्णूपंत वाल्हेकर, भरे गावचे माजी सरपंच पोपटराव ववले व पौड गावचे ज्येष्ठ शिवसैनिक सतीश पवार यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला .
या प्रसंगी ज्येष्ठ नेते नानासाहेब शिंदे, माजी उपसभापती भानुदास पानसरे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनील वाडकर, शिवसहकार सेनेचे सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब भांडे, मंडळाचे अध्यक्ष राम गायकवाड, भारतीय विद्यार्थी सेनेचे सचिव नितीन चांदेरे,सहाय्यक पोलिस निरीक्षक विनायक देवकर, माजी सरपंच माऊली कांबळे,कासारआंबोलीचे सरपंच सचिन धुमाळ, तात्यासाहेब देवकर, संतोष शिंदे, कासारआंबोली तंटामुक्तीचे अध्यक्ष समीर शिंदे,शेखर शिंदे, महेश माणकर ,रामदास पोळेकर, पद्मावती विकास सोसायटीचे माजी चेअरमन जयसिंग गायकवाड,शाखाप्रमुख राहुल धुमाळ, नवयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष रोहिदास धुमाळ, उद्योजक सुनील शिंदे,विकास शिंदे, रोची कंपनी चे युनियन प्रतिनिधी बाळासाहेब नरवडे, मुळशी आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बलकवडे, मुळशी तालुका माथाडी संघटनेचे अध्यक्ष नेवासकर,बाळासाहेब शिंदे, अरुण भिलारे,दयानंद शिरसाठ, उद्योजक अंकुश गोडांबे,रामभाऊ धुमाळ,नितीन थोरात, जालिंदर तापकीर, संतोष कांबळे,लहू गिरीगोसावी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखा शिवशक्ती चौक घोटावडे फाटा व सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.