logo
add image
add image
Blog single photo

पिरंगुटच्या उपसरपंच पदी लक्ष्मण गणपत निकटे यांची बिनविरोध निवड


मुळशी : पिरंगुट (ता. मुळशी) ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी लक्ष्मण गणपत निकटे यांची बिनबिरोध निवड करण्यात आली. या आधीच्या उपसरपंच सुरेखा पवळे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच सुरेखा पवळे यांनी राजीनामा दिल्याने उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली. या निवडीसाठी सरपंच चांगदेव पवळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यामध्ये लक्ष्मण निकटे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी डी. डी. भोजणे यांनी काम पाहिले. 

             यावेळी सरपंच चांगदेव पवळे, मावळत्या उपसरपंच सुरेखा पवळे, माजी उपसरपंच रामदास गोळे, विकास पवळे, प्रवीण कुंभार, सदस्य राहुल पवळे, अंकुश खडके, माजी उपसरपंच अश्विनी निकटे, छाया पवळे, रेश्मा पवळे, सुवर्णा नवाळे, सदस्या सारिका केदारी उपस्थित होते. 

            निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सर्व सदस्य व ग्रामस्थ यांना विश्वासात घेऊन गावाचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच लक्ष्मण निकटे यांनी निवडीनंतर सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top