पिरंगूट : मुळशी तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाने आज युवक मेळाव्याचे आयोजन केलेले असून पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदी यांची निवड झाल्याबद्दल मुलखेडचे सरपंच पै. सुखदेव तापकीर यांचा सत्कारही यावेळी करण्यात येणार असून या मेळाव्याला खासदार सुप्रिया सुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी दिली आहे.
या मेळाव्याला महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष सचिन घोटकुले उपस्थित राहणार असून हा मेळावा दत्तकृपा मंगल कार्यालय हनुमान चौक घोटावडे येथे सोमवार दि १५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.