पौड : पीएमआरडीएच्या मतदान झालेल्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुलखेडचे सरपंच सुखदेव तापकीर हे सहाव्या फेरीअखेर आवश्यक असलेला कोठा पूर्ण करून विजयी झालेले आहे.
आज सकाळी सुरू झालेल्या पीएमआरडीएच्या मतमोजणीत प्रियांका पठारे वेल्हे आणि संदीप भसे खेड हे दोन उमेदवार विजयी झालेले होते. तर पहिल्या फेरीत सुखदेव तापकीर यांना ५८ मते मिळाली होती. सहाव्या फेरीअखेर मताचा आवश्यक असणारा कोठा पूर्ण करत तापकीर हे विजयी झालेले आहेत. मुळशीत एकूण झालेल्या ९० मतांपैकी पसंती क्रमांक १ ची मते राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुखदेव तापकीर यांना ५८, काँग्रेस उमेदवार निकिता सणस यांना १८,शिवसेना उमेदवार सुरेखा तोंडे यांना ३,भाजपा उमेदवार मींनाथ कानगुडे यांना १ असे एकूण ८० मतदान झाले तर १० मते बाहेरच्या तालुक्यातील उमेदवारांना गेली.
पीएमआरडीएच्या निवडणूकीत विजय संपादन केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर,मुळशीचे सभापती पांडुरंग ओझरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, माजी सभापती कोमल वाशिवले,कासारआंबोलीचे माजी सरपंच माऊली कांबळे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.