पिरंगुट : भुगाव (ता. मुळशी) येथील सरपंच निकिता रमेश सणस यांनी जिल्हाध्यक्ष व आमदार संजय जगताप आणि आमदार संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकार क्षेत्रातील निवडणुकीच्या तयारी साठी काँग्रेसचा मेळावा घोटावडे येथे संपन्न झाला. त्यावेळी अनेकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सरपंच निकिता सणस ही त्यावेळी प्रवेश करण्याची माहिती होती. पण काही कारणास्तव प्रवेश झाला नाही. अखेर आज पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात हा प्रवेश झाला.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष देविदास भन्साळी, पुणे जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष संग्राम मोहोळ, महेश ढमढेरे, पृथ्वीराज पाटील, मुळशी तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, भोर अध्यक्ष शैलेश सोनवणे, वेल्हा अध्यक्ष नानासाहेब राऊत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, जिल्हा परिषद दिनकर धरपाळे, मुळशी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शिवाजी तांगडे, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष सुहास भोते, भोर विधानसभा अध्यक्ष राहुल जाधव, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कुमार शेडगे, लहू निवंगुणे, अतुल कारले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार संग्राम थोपटे यांची काम करण्याची पध्दत आणि कार्यकर्त्यांना बळ देण्याची शैली पाहून आज काँग्रेस पक्षात स्वखुशीने प्रवेश केला असल्याचे सरपंच निकिता सणस यांनी सांगितले.
मुळशी तालुक्यात अनेक कार्यकर्ते काँग्रेस पक्षात प्रवेश करत असून काँग्रेस पक्षाची मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस ताकत वाढत असून आगामी जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणूकीत काँग्रेस पक्ष मोठे आव्हान उभे करणार असल्याचे मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी सांगितले.