पौड : मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व सहकारी संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर उद्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या असून मेळाव्याच्या निमित्ताने तालुक्यात काँग्रेसही निवडणूकीचे रणशिंग फुंकणार आहे.
हा मेळावा उद्या ( दि.२१ आँक्टोबर ) रोजी शेळकेवाडी येथील जय सुचंद्रिका मंगल कार्यालयात दुपारी १२.३० मिनिटांनी होणार असून आमदार संग्राम थोपटे उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या मेळाव्याला माजी खासदार विदूरा नवले, अशोक मोहोळ हे सुध्दा उपस्थित राहणार आहेत.
तालुक्यातील जिल्हा परिषद,पंचायत समिती व सहकारी संस्थांच्या निवडणूका लवकरच होत असून मुळशी तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. य मेळाव्यात कृषी उत्पन्न बाजार समिती,शासकीय कमिटीवर निवड झालेल्या पदाधिकाय्रांचा सत्कारही या वेळी करण्यात येणार असल्याची माहिती मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.