मुळशी : काशिगच्या सरपंचपदी वर्षां राहुल कदम यांची बिनविरोध निवड तर उपसरपंचपदी स्मिता लहू टेमघरे यांची निवड काशिग ग्रामपंचायतीत डफळ व त्यांच्या सहकार्यांना सत्ता आणण्यात यश आले आहे.काशिग ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे अनुसूचित जमाती साठी राखीव होते यासाठी एकमेव अर्ज हा वर्षा राहुल कदम यांचा आला होता त्यामुळे सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली. तसेच उपसरपंच पदासाठी ग्रामविकास आघाडी कडुन स्मिता लहु टेमघरे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार हर्षदा धनजंय टेमघरे , श्याम सहादु शेळके यांचा अर्ज दाखल होता त्यात स्मिता लहु टेमघरे यांना ४ मते तर हर्षदा धनजंय टेमघरे यांना २ मते तर श्याम सहादु शेळके यांना १ मते पडली होती यात ग्रामविकास आघाडीच्या स्मिता टेमघरे या उपसरपंच पदी विराजमान झाल्या आहेत.
सरपंच व उपसरपंच करण्यात ग्रामविकास आघाडीचे प्रमुख व शिवसहकार सेनेचे तालुकासंघटक ज्ञानेश्वर डफळ,माजी सरपंच काशिग ग्रामपंचायत नवनाथ टेमघरे, युवासेना उपतालुकाधिकारी नामदेव तिडके, युवा नेते आरपीआय राहुल कदम यांचे योगदान होते. या निवडणुकीवेळी नवी मुंबई शहराचे आरपीआयचे नेते प्रभाकरदादा कांबळे, मुळशी तालुका आरपीआयचे तालुकाअध्यक्ष सतीश केदारी, माजी सरपंच अकोले, माजी उपसरपंच कोथुर्णे ग्रामपंचायत अंकुश सोनवणे, काशिग महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष लहु टेमघरे, काशिग गावचे युवा नेते रोहीत कदम,सामाजिक कार्यकर्ते कान्हु बोंद्रे,भाऊ टेमघरे, मारुती डफळ, विजय टेमघरे, संतोष कदम, विजय डफळ, युवा उद्योजक वसंत तिडके, अविनाश मोहोळ, राम टेमघरे, सचिन टेमघरे, अजित तिडके, रघुनाथ बोंद्रे, आनंद बोंद्रे, राकेश डफळ हे उपस्थित होते.
नवीन ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांचे आभार हे शिवसहकार सेनेचे तालुकासंघटक ज्ञानेश्वर डफळ यांनी केले .यावेळी त्यांनी सांगितले की ग्रामपंचायतीत सर्वांत जास्त निधी आणण्यात येईल.