logo
add image
add image
Blog single photo

कासारआंबोली येथे विकास कामांना निधी कमी पडू देणार नाही : रणजित शिवतरे


पिरंगूट : कासारआंबोली येथे नागरीकरण वाढल्यामुळे  मुळशी प्रादेशिकचे वाढीव पिण्याच्या पाण्यासाठी प्रयत्न करणार असून नागरी सुविधा व जनसुविधा अंतर्गत गावातील विकास कामांसाठी भविष्य काळात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुण देणार आहे.शिंदेवाडी येथील शाळेसाठी दोन वर्ग खोल्या व दोन वर्ग खोल्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर करून देण्यात आलेला आहे. तरी भविष्यात शाळेसाठी निधी कमी पडू देणार नाही ' असे मत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी कासारआंबोली येथे व्यक्त केले.

          ग्रामपंचायत कासारआंबोली यांच्या वतीने कासारआंबोली गावातील विविध विकास कामांचे भुमीपूजन पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांच्या हस्ते तसेच मुळशी पंचायत समिती सभापती पांडूरंग ओझरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य अंजली कांबळे , सागर काटकर, उपसभापती विजय केदारी, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे,नियोजन समिती सदस्य अमित कंधारे,माजी सभापती बाबा कंधारे,शांताराम इंगवले,सुनिल चांदेरे,माजी उपसभापती भानुदास पानसरे,नाना मारणे, प्रविण साठे, लहु चव्हाण,भरत मारणे, सुहास दगडे,सचिन अमराळे विलास अमराळे,धोंडे भाऊसाहेब यांच्या उपस्थित करण्यात आले.

         मुळशी कृषी उत्पन्न समितीचे संचालक सुनिल वाडकर, माजी सरपंच ज्ञानोबा कांबळे, मुळशी तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अध्यक्ष महादेव कोंढरे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमासाठी शिवसेना नेते नानासाहेब शिंदे मुळशी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक रामभाऊ गायकवाड,  उपसरपंच सुवर्णा मारणे ,ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल शिंदे, रणजित गायकवाड ,उमेश सुतार, शंकर सुतार, रेश्मा गायकवाड, प्रिती शिंदे, माधुरी धुमाळ, नेहा सुतार,पुजा सुतार, माजी सरपंच राजेंद्र मारणे,संतोष शिंदे, समिर शिंदे, मारुती शिंदे, प्रकाश सुतार, माजी उपसरपंच शेखर शिंदे, विठ्ठल धुमाळ,आनंता धुमाळ,  महेश मानकर,भिमराव धुमाळ, हिरामण धुमाळ,  हिरामण भिलारे, बाळासाहेब शिंदे,आशाताई लांडगे, तुषार मानकर, प्रकाश कांबळे,प्रशांत गायकवाड,अजय सावंत, अतुल सुतार, बाळासाहेब गाभाणे, प्रदीप सुतार, रामभाऊ सुतार, संदीप सुतार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक सरपंच सचिन धुमाळ यांनी केले. सुत्रसंचालन सागर धुमाळ यांनी केले तर आभार स्वप्निल कांबळे यांनी मानले.

add image
add image

Leave Comments

Top