पिरंगूट : महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुळशी तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अनिल मातेरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरादरम्यान २७ रक्तदात्यांनी सहभाग घेत रक्तदान केले.
मुळशी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी अध्यक्ष अनिल मातेरे यांच्या वाढदिवसानिमित्त शेळकेवाडी येथील सुचंद्रिका मंगल कार्यालय येथे रविवार दि. १७ आँक्टोबर रोजी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तालुक्यातील २७ रक्तदांत्यांनी रक्तदान करून सहभाग नोंदविला.
या शिबीराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, पुणे शहराध्यक्ष व नगरसेवक वसंत मोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष ॲड रविंद्र गारूडकर, मनसे नेते संतोष पाटील, पुणे जिल्हा सरचिटणीस योगेश खैरे, सचिव सचिन पांगारे, रस्ते आस्थपना अध्यक्ष नवनाथ राजिवडे, सचिन मोहने तसेच मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.या रक्तदान शिबीराचे आयोजन मनसेचे नेते सोमनाथ कवडे यांनी केले होते.तर रक्तसंकलनाचे काम सिम्बाँयसिस युनिर्व्हसिटी ब्लड बँकेने केले.