पिरंगूट : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी येथे शेतकऱ्यांना मोटारीखाली चिरडण्याच्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदच्या दिलेल्या हाकेला मुळशी तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला.
मुळशी तालुक्यातील शिवसेना - राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकञ येत घोटावडे फाटा येथे निषेध नोंदविला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे,शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे आणि महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटीका स्वाती ढमाले यांची भाषणे झाली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रामभाऊ ठोंबरे,उपसभापती विजय केदारी,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, काँग्रेस तालुका अध्यक्ष गंगाराम मातेरे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे,जिल्हा परिषद सदस्य शंकर मांडेकर, अंजली कांबळे,शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटीका स्वाती ढमाले,राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अंकुश मोरे, दिलीप दगडे,राम गायकवाड,संग्राम मोहोळ, शांताराम इंगवले, बाबा कंधारे, दगडूकाका करंजावणे, प्रकाश भेगडे,नामदेव टेमघरे,ज्ञानेश्वर डफळ, दीपक करंजावणे, दादाराम मांडेकर, सुहास भोते, शिवाजी तांगडे, माऊली कांबळे, प्रसाद खानेकर, दत्ता झोरे, कालिदास शेडगे, गोविंद सुरुसे, बाळासाहेब सणस, केरबा चौधरी, जितेंद्र इंगवले, सागर धुमाळ, गणपत भोयने, शिवाजी बलकवडे,वैभव पवळे,कालिदास शेडगे,गणेश भोयणे, भाऊ केदारी, महादेव गोळे, भानुदास गोळे, दिलीप गोळे,कैलास मारणे, लक्ष्मण निकटे, शशिकांत मोरे, संतोष शिंदे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.