पिरंगूट : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घोडेदौड सुरू आहे.सरकार लोकांसाठी असून लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबध्द आहे.हे सरकार तुमच्या सोबत आहे.शिवसेनेच्या माध्यमातून असलेले सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे प्रतिपादन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंञी एकनाथ शिंदे यांनी पिरंगूट - घोटावडे फाटा येथे केले.
शिवसेना नेते तथा उद्योजक माधवराव उर्फ आबासाहेब शेळके यांच्या नवीन शिवसेना जनसंपर्क कार्यालायाचे उदघाटन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंञी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले.यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार श्रीरंग बारणे, पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर, शिवसेना समनव्यक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर,शिवसेना नेते तथा उद्योजक आबासाहेब शेळके,शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, जिल्हा परिषद सदस्य सागर काटकर, महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटीका स्वाती ढमाले, युवासेना जिल्हाधिकारी अविनाश बलकवडे,महिला जिल्हा संघटीका संगिता पवळे,उद्योजक अक्षय शेळके, मुळशी तालुका महिला आघाडी संघटिका ज्योती चांदेरे,शिवसहकार सेना तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर डफळ,भोर विधानसभा संघटक प्रकाश भेगडे, शिवसेना उपजिल्हा संघटक सचिन दगडे,समन्वयक दिपक करंजावणे,माजी तालुका प्रमुख रविकांत धुमाळ, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे नामदेव टेमघरे, वैभव पवळे,अमित कुडले, कैलास मारणे,अनिल आधवडे,संतोष दगडे,रामदास पवळे,संतोष शिंदे,मोहन शिंदे, कालिदास शेडगे, दत्ता झोरे,लहू लायगुडे,मिथून खिलारी, रूपेश जाधव तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंञी एकनाथ शिंदे म्हणाले की, पीएमआरडीएचे खाते माझ्याकडे असून कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही.रिंगरोडचे प्रलंबित असलेले कामही नागरिकांचे म्हणणे ऐकून केले जाईल.या भागातील विकासाला चालना देण्याचे काम केले जाईल.आबासाहेब शेळके यांचे उदघाटन झालेले कार्यालय तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असून त्याचा सदूपयोग आडल्या नडलेल्याचे प्रश्न सोडवण्यासाठी करावा.
या कार्यक्रमाचे आयोजन शाकीर शेख, पोपट ववले, विनोद मारणे, सोमनाथ शिंदे, सौरभ सांळूके यांनी केले होते.