logo
add image
add image
Blog single photo

बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया सेल अध्यक्षपदी सतीश सुतार यांची निवड


पौड : बारामती लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मिडीया सेल अध्यक्षपदी सुतारवाडी ( ता.मुळशी ) येथील सतीश पांडुरंग सुतार यांची निवड करण्यात आली आहे. खासदार सुप्रिया यांच्या हस्ते सतीश सुतार यांना नियुक्तीपञ देण्यात आले.

       सतीश सुतार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पौड आंबवणे गट अध्यक्ष,तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष,पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी सोशल मीडिया सरचिटणीस, तालुका राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष अशी पदे भूषविली आहेत.

       यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस फ्रंटलचे प्रदेश समन्वयक सुहास उभे, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष संतोष कोलते,मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महादेव कोंढरे, युवक अध्यक्ष निलेश पाडाळे, गणेश पवळे उपस्थित होते.

       सोशल मिडीयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळात रूचविण्यासाठी काम करणार असल्याचे निवडीनंतर सतीश सुतार यांनी सांगितले.

add image
add image

Leave Comments

Top