logo
add image
add image
Blog single photo

आबासाहेब शेळके यांच्या नवीन जनसंपर्क कार्यालयांचे उदघाटन रविवारी


पिरंगुट : शिवसेना नेते तथा उद्योजक माधवराव उर्फ आबासाहेब शेळके यांच्या नवीन शिवसेना जनसंपर्क कार्यालाचे उदघाटन होणार. रविवारी (ता. १०) सकाळी अकरा वाजता महाराष्ट्र राज्याचे नगरविकास तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हे उदघाटन होणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते तथा उद्योजक आबासाहेब शेळके यांनी दिली.

            घोटवडेफाटा (ता. मुळशी) येथील कृपा हॉटेल शेजारी हे नवीन शिवसेना जनसंपर्क कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उदघाटन होणार आहे. पुणे जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख व माजी मंत्री सचिन अहिर, शिवसेना समनव्यक माजी आमदार रविंद्र मिर्लेकर, पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे.

add image
add image

Leave Comments

Top