logo
add image
add image
Blog single photo

खारावडे गावच्या उपसरपंचपदी लता जोगावडे यांची बिनविरोध निवड.


पिरंगूट : खारावडे ( ता.मुळशी) गावच्या उपसरपंच पदी श्रीमती लता मारुती जोगावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. आधीचे उपसरपंच शिवाजी मारणे यांनी ठरल्याप्रमाणे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. उपसरपंच पदासाठी लता जोगावडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध उपसरपंच म्हणुन निवड झाली. 

        यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून रासकर भाऊसाहेब यांनी काम पाहिले. यावेळी सरपंच लक्ष्मण मारणे, माजी उपसरपंच शिवाजी मारणे, सदस्य लक्ष्मण शेडगे, सखाराम पवार, अनिता गायकवाड, भागुबाई आखाडे, वैशाली मारणे उपस्थित होते. 

             यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच लता जोगावडे यांचा सत्कार मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती महादेव आण्णा कोंढरे, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकर मांडेकर, उपसभापती विजय केदारे, शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे, शिवसेना नेते दिनेश येनपुरे, रविकांत धुमाळ, उद्योजक आबा शेळके, माजी सरपंच रामभाऊ मारणे, हनुमंत मोहोळ,  यांचे हस्ते करण्यात आला. 

          यावेळी उपस्थित मध्ये माजी सरपंच शंकरराव मारणे, सदाशिव मारणे, पोलिस पाटील प्रविण शेडगे, नरेश मारणे, माऊली साळेकर, माऊली ढेबे, सागर जोगावडे, अमृत मारणे, हर्षल मारणे, विश्र्वास जोगावडे, विठ्ठल ढेबे, अनिल गावडे, संजय गावडे, राजा गायकवाड, चंद्रकांत ढेबे, मारुती आखाडे, रामदास राजहंस, अक्षय जोगावडे, सौरभ जोगावडे, अमित सुतार, सागर शेजवळ, प्रसाद मारणे, सुनिल आखाडे, बबन मरगळे, संजय ढेबे, सागर मारणे, मंगेश शेठ शेडगे, नाना शेजवळ,महेश मारणे, संभाजी मारणे,  अक्षय मारणे, असे अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.



add image
add image
  • Blog single photo
    2021-10-07 09:35:58

    Rajendra Gawade

    : खारावडे ( ता.मुळशी) गावच्या उपसरपंच पदी श्रीमती लता मारुती जोगावडे यांची बिनविरोध निवड

  • Blog single photo
    2021-10-07 09:40:35

    Rajendra Gawade

    खारावडे ( ता.मुळशी) गावच्या उपसरपंच पदी श्रीमती लता मारुती जोगावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली श्री:राजेंद्र गावडे

Leave Comments

Top