मुळशी : अकोले ( ता.मुळशी ) येथील सरपंचपदी पद्मा ज्ञानेश्वर सातपुते यांची तर उपसरपंचपदी दत्ताञय वाघू कुरपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली असून गेली २५ वर्षाची सत्ता राखण्यास भाजपाचे मारूती कुरपे, बाळासाहेब जाधव, बाळासाहेब कुरपे,भरत कुरपे, दत्ताञय जाधव,शशिकांत चव्हाण यांना यश आले आहे.
सरपंच व उपसरपंच निवडीवेळी पद्मा सातपुते व दत्ताञय कुरपे यांचे उमेदवारी दाखल झाले. माञ दुसरा कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने हि निवड बिनविरोध झाली. सरपंच व उपसरपंच निवडीवेळी कल्पना जाधव,सतिश मराठे, योगेश कुरपे,संगिता चव्हाण, प्रियांका सातपुते हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
यावेळी भुगावच्या सरपंच निकीता सणस, भुगावचे माजी उपसरपंच राहुल शेडगे, रमेश सणस, भाजपाचे तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, किरण कुरपे,माजी उपसरपंच सुजाता जाधव, सादु जाधव, विजय कुरपे उपस्थित होते. अकोले गावच्या नवनिर्वाचित सरपंच पद्मा सातपुते या भुगावचे माजी उपसरपंच राहुल शेडगे यांच्या भगिनी आहेत.