logo
add image
add image
Blog single photo

प्रतिक्षा संपली ,अखेर शाळेची घंटा वाजली


 भुगांव : ही आवडती मज मनापासुनी शाळा लाविती लळा लडीवाळा जशी माउली बाळा.जसे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात.तशी मुलांवर शिक्षकाची असते.

       तब्बल दीड वर्षानंतर शाळा सुरु  झाल्याचे चित्र भुगांव गावात पहावयला मिळालं शाळा मोठ्या उत्साहात ढोल ताशाच्या गजरात सुरु करण्यात आल्या.सरपंच निकिता सणस यांनी मुलांचे औक्षण करून गुलाबाचे फुल देऊन स्वागत केले. दि.१७ मार्च २०१९ पासून बंद असलेली शाळा आज इ .५ वी ते इ.७ वी तील मुले मोठ्या प्रमाणात शाळेत हजर झाली.मुलांच्या चेहे-यावरील आनंद पाहण्यासारखा होता मुलांचे स्वागत ढोल – ताशांच्या गजरात आनंदाने करण्यात आले.विद्यार्थ्यांचे स्वागत सरपंच निकिता सणस.,मा.उपसरपंच विशाल भिलारे,अर्चना  सुर्वे  ,सुनिता पोळ,ग्रामविकास अधिकारी मदन शेलार,पोलिस पाटील नितीन चोंधे, विजय सणस , दिपक करंजावणे, बबन मरळ, माउली सुर्वे , यशवंत शेडगे तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

            भुगांव ग्रामपंचायत तर्फे सर्वा विद्यार्थ्यांना सॅनिटायझर आणि N95 मास्क यांचे वाटप करण्यात आले .शाळा सुरु होण्यापुर्वी संपुर्ण शाळेची स्वच्छता ,शाळा सॅनिटायझ करणे ,परिसर पेंटिंग ,स्वच्छता ,वर्ग खोल्यांचे निर्जंतुकीकरण तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सर्व कामे भुगांव ग्रामपंचायती ने केली.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र १ व २ चे मुख्याध्यापक ,सर्व शिक्षक यांनी शाळेचे व वर्ग खोल्यांचे सुशोभीकरण करून आनंदी वातावरणाची निर्मिती केली.

add image
add image

Leave Comments

Top