पिरंगूट : कासारआंबोली ( ता.मुळशी ) ग्रामपंचायत हद्दीत पहिला व दुसरा असा मिळून ५००० हजार लसीकरणाचा टप्पा पार झाला असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्या सौ. माधुरी सागर धुमाळ यांनी दिली आहे.
पुणे कोलाड महामार्गावर मोठी लोकसंख्या असलेली कासारआंबोली ग्रामपंचायत आहे. यामध्ये कासारआंबोली,सुतारवाडी,शिंदेवाडी,मानकरवाडी हा परिसर येत असून ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक औद्योगिक कारखाने आहेत. नवीन सोसायट्या तसेच भाडेकरूमुळे गावची लोकसंख्या झपाट्याने वाढलेली आहे. जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच आरोग्य विभागाकडून लस पुरवठा करण्यात आल्याने दोन्ही लस घेतलेल्यांची संख्या ५००० हजारांच्या पुढे गेली आहे.
कासारआंबोली ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण, सोसायट्या असल्यामुळे लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.तरी अजून अधिकचा लस पुरवठा व्हावा अशी मागणीही यावेळी ग्रामपंचायत सदस्या सौ. माधुरी सागर धुमाळ यांनी केली आहे.