logo
add image
add image
Blog single photo

हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृतीदिन पौड येथे साजरा


पौड :  हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मृतिदिनानिमित्त पौड येथे ८० आदिवासी कातकरी बांधवांना मुळशी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे यांच्या हस्ते जातीचे दाखले वाटप करण्यात आले. 

       या कार्यक्रमाला मुळशी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाराम मांडेकर, प्रकल्प अधिकारी दहिफळे साहेब, माळे साहेब, प्रसाद खानेकर, अरुण गाभणे, युवक काँग्रेस उपाध्यक्ष गणेश पवळे, गणेश कंधारे,आशिष नागरे, आदिवासी कल्याण संघ मुळशी तालुका अध्यक्ष संजय जाधव,विशेष कार्यकारी अधिकारी विशाल नागरे,रवी जाधव,दत्ता वाघमारे, विजय वाल्हेकर आदी पदाधिकारी -  कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी विकास संघाचे अध्यक्ष व मुळशी तालुका युवक काँग्रेस उपाध्यक्ष मा शंकर बत्ताले यांनी केले होते.

       यावेळी बोलताना शंकर बत्ताले म्हणाले की,  आदिवासी कातकरी समाज हा गेली अनेक पिढ्या मुळशी तालुक्यात वास्तव्य करीत असून त्यांना स्वतःचे हक्कांचे जागा व घर नाही. शासनाने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तालुक्यात एकही आदिवासी आश्रमशाळा नाही. १२ वी पर्यंत आश्रमशाळा उपलब्ध करून द्यावी.

add image
add image

Leave Comments

Top