पिरंगूट : गरिब,निराधार व वंचितांना मिळालेल्या पदाच्या माध्यमातुन संपुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार असून कासारआंबोली गावच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही असे प्रतिपादन जिल्हा नियोजन समिती सदस्य अमित कंधारे यांनी कासारआंबोली येथे केले.
कासारआंबोली येथील श्रीमंत कासार पाटील मंडळाच्या वतीने श्री हेरंब विनायक महागणपती मंदिरात जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी अमित कंधारे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालकपदी दगडुकाका कंरजावणे,सुनिल वाडकर,राम गायकवाड, बंडु मेंगडे,भगवान नाकती तसेच उज्वला मारणे,भरत मारणे,आशा लांडगे,सविता सुतार यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपसभापती विजय केदारी,जिल्हा परिषद सदस्या अंजली कांबळे,माजी सरपंच राजेंद्र मारणे,उपसरपंच सुवर्णा मारणे, ग्रामपंचायत सदस्य रंजित गायकवाड व तुषार मानकर उपस्थित होते .या कार्यक्रमाचे आयोजन अध्यक्ष रामप्रवेश चव्हान, उपाध्यक्ष भारत गुंड,कार्याध्यक्ष दिपक कांबळे,प्रकाश मरळ,योगेश मरळ,सागर कांबळे,बापुराव पाटील,राजु रा़ँय,विष्णु खंबायतकर यांनी केले.