पौड : कासारआंबोली ( ता.मुळशी ) येथील सरपंचपदी पद्मावती विकास पँनेलचे सचिन धुमाळ यांची तर उपसरपंचपदी स्वप्निल शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.
१३ सदस्य असलेल्या कासारआंबोली ग्रामपंचायत सरपंच पदासाठी दोन माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य सचिन धुमाळ व उमेश सुतार यांनी तर उपसरपंचपदासाठी स्वप्नील शिंदे आणि शंकर सुतार यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यावेळी झालेल्या मतदानामध्ये सरपंचपदासाठी सचिन धुमाळ यांना सात तर उमेश सुतार यांना सहा तसेच उपसरपंचपदासाठी स्वप्निल शिंदे यांना सात तर शंकर सुतार यांना सहा मते पडली. मतदानावेळी सचिन धुमाळ, स्वप्नील शिंदे, सुवर्णा मारणे, छाया भिलारे, उमेश सुतार, स्वप्नील कांबळे, माधुरी धुमाळ, रेश्मा गायकवाड, शंकर सुतार, रंजित गायकवाड, प्रीती शिंदे, नेहा सुतार, पूजा सुतार हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
निवडीनंतर सरपंच सचिन धुमाळ व उपसरपंच स्वप्नील शिंदे यांचा माजी उपसभापती भानुदास पानसरे, राष्ट्रवादी काँग्रेस माजी तालुका अध्यक्ष सुनिल वाडकर, शिवसेना नेते नानासाहेब शिंदे , भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक राम गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस पाटील स्वाती सुतार, माजी सरपंच राजेंद्र मारणे, गणेश सुतार, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे मुळशी तालुका कार्याध्यक्ष सागर मारणे, मीना शिंदे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस भोर विधानसभा अध्यक्ष सागर धुमाळ, माऊली कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य शेखर शिंदे, समिर शिंदे, बाळासाहेब शिंदे, संतोष शिंदे उपस्थित होते