पौड : पौड ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच जगदीश लांडगे यांच्या वतीने स्वखर्चाने आपले वडील कै. रामचंद्र बाबूराव लांडगे यांच्या स्मरणार्थ ग्रामदैवत श्री दिगंबरनाथ मंदिर आणि पौड बसस्थानक परिसरात हायमँस्ट लाईट बसविण्यात आली.
पौड बसस्थानक परिसरात अनेक दुकाने असून राञीचा या परिसरात अंधार असतो तसेच ग्रामदैवत श्री दिंगबरनाथ मंदिर परिसरातही राञी नागरिकाचा वावर असतो.दोन्ही ठिकाणी प्रकाश व्यवस्था असावी अशी मागणी व्यापारी तसेच रहिवाशी नागरिकांची असायची. शासन दरबारीही अनेक वेळा मागणीही करण्यात आली.आलेल्या हायमस्ट लाईट दुसरीकडे बसविण्यात आले होते. माञ गरज असलेला परिसर अंधारातच राहिला होता. याची दखल घेत सरपंच जगदीश लांडगे यांनी स्वखर्चाने पौड गावात दोन हायमस्ट आणले आहेत.यातील श्री ग्रामदैवत दिंगबरनाथ मंदिरापुढील हायमस्ट आज बसविण्यात आलेला असून पुढील दोन दिवसांत पौड बसस्थानक परिसरातीलही हायमस्ट बसविण्यात येणार आहे.
या हायमस्टचे पूजन दिगंबरनाथ मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते सटवाआप्पा उबाळे, नामदेव उबाळे, हनुमंत गुरव, पांडुरंग सुपेकर, महादेव पिंगळे, माळी गुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी युवा सेना संघटक संकेत दळवी,पोलिस पाटील संजय पिंगळे, ग्रामविकास अधिकारी विजय कदम, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद शेलार, अजय कडू, प्रशांत वाल्हेकर, ग्रामस्थ शाम नवले, धनंजय जोशी, आशुतोष पिंगळे, सागर लांडगे,भास्कर राऊत, विशाल राऊत, ओंकार उबाळे,सचिन शेरेकर, सोन्या लांडगे, गणेश उबाळे, डॉ. शरद भोसले, सागर उबाळे, रवी ओंबळे, नाना दळवी, विद्युत वितरण कर्मचारी शिंदे तसेच दिगंबरनाथ तरुण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.