logo
add image
add image
Blog single photo

संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगूट येथे शिक्षक दिन उत्साहात


पिरंगुट : संस्कार इंग्लिश मीडियम स्कूल पिरंगूट येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्कार स्कूलमध्ये शिक्षक व पत्रकार यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला.

                  या वेळी मुळशी तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष बंडू दातीर, पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष रमेश ससार, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझीरे, श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाचे प्राचार्य संतोष भोकरे, पत्रकार प्रदीप पाटील, दीपक सोनवणे, रामदास मानकर, गोरख माझिरे, कालिदास नागरे, विजय वरखडे, प्रवीण सातव, जय वाघजाई देवी शिक्षण संस्थेचे संस्कार प्रायमरी स्कूलचे अध्यक्ष शिवाजी साठे, मुख्याध्यापिका स्नेहा साठे आदी उपस्थित होते. 

                 प्राचार्या स्नेहा साठे म्हणाल्या, पत्रकार आणि शिक्षक हे समाजव्यवस्थेचे दोन आधारस्तंभ आहे. दोघे समाजपरिवर्तनाचे सामर्थ्य ठेवतात. शिक्षणाशिवाय विद्यार्थी अपूर्ण आहे. शिक्षक हा विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर संस्कार व संस्कृती चालीरीती परंपरा असे पैलू पाडत असतो आणि त्यातूनच आदर्श विद्यार्थी घडत असतो. म्हणून आजच्या दिवसाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

                 यानिमित्त राज्य स्तरावरील एनएसएसई परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत शाळेतील २२ विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व ट्रॉफी देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. सुमीना ठाकूर, लता मुगवने, प्रशांत देशमुख, योगिता खैरनार, सायली पानसरे, अश्विनी नलावडे, प्रियांका गायकवाड,भारती सोनवणे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते. 

                कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली आंबेकर, पल्लवी पाठक, पल्लवी गोळे यांनी केले. आभार दिपाली भावसर यांनी मानले.

add image
add image
  • Blog single photo
    2021-09-06 04:08:51

    Manas

    Manas

Leave Comments

Top