पौड : दिपकभाऊ निकाळजे माथाडी आणि जनरल युनियन मुळशी तालुका अध्यक्षपदी पौड येथिल अरविंद अशोक कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली.युनियनचे महाराष्ट्र सचिव अक्षय निकाळजे यांच्या हस्ते अरविंद कांबळे यांना नियुक्तीपञ देण्यात आले आहे.
यावेळी महाराष्ट्र बहूजन सेना अध्यक्ष योगेश सोनवणे,युनियनचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुहास गायकवाड,हवेलीचे अध्यक्ष दत्ता कांबळे,अमजद मुलाणी, समीर मुलाणी,जमीर मुलाणी,सौरभ रायरीकर,किशोर भोसले, नागेश तांबेकर,अमर वाघवले,संजय धानके,रविंद्र गुरव उपस्थित होते.मुळशी तालुक्यातील कामगार क्षेत्रातील कामगारांच्या व माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निवडीनंतर अरविंद कांबळे यांनी सांगितले.