logo
add image
add image
Blog single photo

सत्कार्य करणाऱ्याचा पेरिविंकलकडून सत्कार : माजी उपमहापौर दिपक मानकर


पिरंगुट : प्रत्येकाच्या आयुष्यात दोन गुरू असतात एक म्हणजे आई - वडील आणि दुसरे म्हणजे शिक्षक. पेरिविंकल शाळेत संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्याचे काम होत आहे. विद्येच्या माहेरघरात विद्येला न्याय द्यायचे काम याठिकाणी होत आहे.सत्कार्य करणाऱ्यांचा पेरिविंकलकडून झालेला सत्कार हि अभिमानाची बाब आहे. असे प्रतिपादन पुण्याचे माजी उपमहापौर व नगरसेवक दीपक मानकर यांनी केले. 

                   बावधन (ता. मुळशी) येथील चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरीविंकल इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये राष्ट्रीय शिक्षकदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी माजी उपमहापौर दिपकभाऊ मानकर, नगरसेविका स्वप्नाली सायकर, सरपंच पियुषा दगडे, माजी सरपंच गणेश दगडे, पेरिविंकलचे संस्थापक - अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष रमेश ससार, मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझिरे,पत्रकार संजय दुधाणे, दीपक सोनवणे, प्रवीण सातव, पप्पू कंधारे, सचिन केदारी, सचिन विटकर, सागर शितोळे, गणेश हुंबे, महेश आल्हाट, बावधन शाखेच्या प्राचार्या नीलिमा व्यवहारे, पिरंगुट शाखेचे प्राचार्य अभिजित टकले, सुस शाखेच्या प्राचार्या निर्मल पंडित, रुचिरा खानविलकर, रश्मी पाथरकर, पूनम पांढरे आदी मान्यवर व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल म्हणाले, शिक्षक हा सर्वात मोठा गुरू आहे. करोनाच्या काळात देशभरातील सर्व शिक्षकांनी मोठे कार्य केले आहे. शिक्षकांनी नवीन अवांतर वाचन करून तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन गोष्टी अवगत करणे गरजेचे आहे. मुलांना घडविण्याचे काम खऱ्या अर्थाने शिक्षक करत आहे. 

               नगरसेविका स्वप्नाली सायकर म्हणाल्या,  ज्ञान देण्याचे काम शिक्षक करत आहे. स्पर्धेच्या युगात सर्वांनी अद्ययावत असणे गरजेचे आहे.

add image
add image

Leave Comments

Top