पिरंगूट : भारतीय जनता पार्टी मार्फत वकिलांची फौज उभी करून शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत पीएमआरडीएने टाकलेल्या चुकीच्या झोन विरोधात लढा लढला जाईल. शेतकऱ्याचा एकही रुपया खर्च होऊ न देता, ही कायदेशीर लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत गेली तरी भारतीय जनता पार्टी न्याय मिळेपर्यंत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील. यासाठी जन आंदोलन उभे केले जाईल. असे प्रतिपादन माजी राज्यमंञी बाळासाहेब भेगडे यांनी घोटावडे फाटा येथे केले.
घोटावडे फाटा येथील विमल गार्डन येथे भारतीय जनता पार्टी मुळशी तालुक्याच्या वतीने पीएमआरडीएच्या आराखड्यासंदर्भात शेतकऱ्यांसाठी कायदेशीर मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या शेतकरी मार्गदर्शन मेळाव्यासाठी मुळशीतील बहुसंख्ये शेतकरी उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे यांनी केले होते.
पुणे जिल्हा कायदा आघाडीचे अध्यक्ष अँड. संजय सावंत यांनी या आरक्षणासंदर्भात हरकती कशी घ्यावी? हरकती ला कोणते पुरावे जोडावेत. हरकत मान्य झाली नाही तर पुढे काय करावे? कोणत्या आरक्षणाचे फायदे-तोटे काय आहेत. यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांनी महाविकास आघाडीचा विरोध करून शेतकऱ्यांच्या जमिनी कशा बिल्डरांच्या घशात जातील यासंदर्भात केलेली ही तरतूद आहे. अशा शब्दात निषेध व्यक्त केला. या मेळाव्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी आरक्षणासंदर्भात आपल्या समस्या मांडल्या.
या मेळाव्याला पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष किरण दगडे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश सदस्या भारती विनोदे, पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी सरचिटणीस सुवर्णा जोशी, पुणे जिल्हा किसान मोर्चा उपाध्यक्ष काळूराम गायकवाड, पुणे जिल्हा कार्यालय मंत्री वसंत चोरघे, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अध्यक्ष अनुप मारणे, भारतीय जनता पार्टी मुळशी तालुका महिला अध्यक्षा वैशाली सणस, उपाध्यक्ष तानाजी हुलावळे, मनोहर सणस, उपाध्यक्ष मारुती कुरपे, उपाध्यक्ष समीर मारणे, उपाध्यक्ष संतोष साठे,वेगरे गावचे सरपंच मिनाथ कानगुडे, रावडे गावचे सरपंच दीपक माझीरे, आसदेचे उपसरपंच प्रविण भरम, अशोक सुर्वे, सुनील शिंदे, पांडुरंग जाधव, सुरेश ठोंबरे व भारतीय जनता पार्टीचे व युवा मोर्चाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.