मुळशी : मुलखेडच्या सरपंचपदी सुखदेव बाळासाहेब तापकीर तर उपसरपंचपदी करुना महेश तापकीर यांची निवड करण्यात आली आाहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी सचिन लोखंडे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक आर. एस. ढगारे यांनी काम पाहिले.
मुलखेड येथे झालेल्या निवडणुकीत श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी ग्रामविकास पॅनलचे सातही सदस्य निवडून आले होते. नवनिर्वाचित सरपंच सुखदेव तापकीर हे श्री काळभैरवनाथ जोगेश्वरी ग्रामविकास पॅनलचे प्रमुख होते.
नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच व राहुल बाळू तापकीर, श्रीकांत आनंता तापकीर, सिमा संभाजी तापकीर, प्रियंका देविदास तापकीर, कविता राजेंद्र तापकिर या सदस्यांचा सत्कारही करण्यात आला. यावेळी माजी सरपंच व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्ह्याचे सरचिटणिस बाळासाहेब तापकीर, माजी सरपंच किरण भालेराव, तंटामुक्ती अध्यक्ष सर्जेराव तापकीर, काळूराम बलकवडे, भिकाजी तापकीर, ज्ञानेश्वर तापकीर,मुळशी तालुका काँग्रेस उपाध्यक्ष संतोष तापकीर, काशिनाथ तापकीर, नंदू तापकीर, दशरथ तापकीर, शिवाजी तापकीर, बाळू पवार, गणपत तापकीर, अरविंद तापकीर, सहदेव भालेराव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
गावातील सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाचा सर्वांगीन विकास करणार असल्याचे यावेळी तापकीर यांनी सांगीतले.