पिरंगूट : हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे पिरंगूट येथे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा महिला दहिहंडी महोत्सव कोरोना तसेच राज्य सरकारच्या आदेशानुसार रद्द करण्यात आला असल्याची माहिती दहिहांडी उत्सवाचे आयोजक तसेच मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी दिली आहे.
हिंदू गर्जना प्रतिष्ठान तर्फे मुळशी तालुक्यात महिलांच्या सन्मानासाठी तसेच मनोरंजनासाठी गेल्या पाच वर्षापासून महिला दहीहंडी महोत्सव आयोजित करण्यात येत होता.पण राज्य सरकारच्या आदेशानुसार यावेळेसही दहीहंडी महोत्सव रद्द करण्यात येत आहे.यावेळेस महिला दहीहंडी महोत्सवानिमित्त महिला आश्रमामध्ये देणगी आणि साहित्य स्वरूपात देऊन साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती मुळशी तालुका भाजपा युवा मोर्चा कार्याध्यक्ष सागर मारणे यांनी दिली आहे.