कोरोनाच्या काळात आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यायचे? हा प्रश्न समस्त शिक्षक बांधवांना पडलेला. एक तर नैसर्गिक आपत्ती आणि हातातली कामे गेल्यामुळे पालकांची आर्थिक स्थिती खालावलेली. त्यामुळे विद्यार्थी पालक सर्वच बेचैन होते. सुरुवातीला सुट्टी मिळाल्यामुळे मुलांना आनंद झाला. पण घराबाहेर पडण्यास निर्बंध लागल्यामुळे मुलांना मित्रांची भेट होत नव्हती. खेळायला मिळत नव्हती. कडक निर्बंधांमुळे ऑनलाईन शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता.
दुसरा कोणताच पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ज्या पालकांचे जवळ अँड्रॉइड मोबाईल होते. त्यांचे व्हाट्सअप ग्रुप तयार केलेले. ज्यांच्याकडं अँड्रॉइड मोबाईल नव्हते त्यांना शेजारी राहणाऱ्या मित्राकडे जोडी लावून दिली. झूम ॲप च्या मदतीने ऑनलाईन तास सुरू केले. ॲप कसे घ्यायचे,कसे वापरायचे. याचे मार्गदर्शन पालक व विद्यार्थी यांना केले. रोज कृतीपत्रिका पाठवून अभ्यास दिला. व्हिडिओ ,ऑडिओ, गुगल टेस्ट याचाही वापर केला. सरावानंतर मुले चांगल्या प्रकारे मोबाईल ऑपरेट करू लागली. शिक्षणाच्या प्रवाहात येऊ लागले.
सुरुवातीला माईक बंद करा म्हटले तर मुले चुकून ग्रुप च्या बाहेर पडत होती होत होती. पण आता सरावाने सर्व व्यवस्थित झाले आहे. परिस्थितीने आपल्याला एक प्रकारे शिक्षण दिले आहे.
- लेखिका : सौ. मनिषा संजय मारणे (प्राथमिक शिक्षिका)