पौड : मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन ( Human Rights and Anti-corruption organization of india ) पुणे शहर उपाध्यक्ष पदी डॉ.विशाल सूर्यकांत जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठन या देशपातळीवर काम करणाऱ्या या संगठनचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश केदारी व सहसचिव दिपक ओव्हाळ यांनी त्यांना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन डॉ.विशाल जाधव यांचा सन्मान केला आहे. यावेळी मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संगठनचे वैद्यकीय विभाग तालुका उपाध्यक्ष डॉ.महेश देसाई, कला मनोरंजन विभाग पुणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.