पिरंगूट : माले येथील इयत्ता १० वीच्या परिक्षेत ९२.६०% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या कु. सई श्रीराम पडवळ हिला पुढील तांत्रिक उच्च शिक्षणासाठी आमदार संग्राम थोपटे यांच्या सुचनेनुसार मुळशी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने २१,००० मदत करण्यात आली आहे.
मुळशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गंगाराम मातेरे, मुळशी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष सुहास भोते, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दादाराम मांडेकर यांनी हि २१,००० रुपये आर्थिक मदत केली आहे.यावेळी मुलीची आई सुमित्रा पडवळ, सुहास शेंडे, रिहे गावचे उपसरपंच नवनाथ ओझरकर, शेखर ओझरकर, संभाजी ओझरकर, दिलीप ओझरकर, मल्हारी ओझरकर, शेखर ओझरकर, पांडुरंग ओझरकर उपस्थित होते.