logo
add image
add image
Blog single photo

मुळशी तालुका शिवसेनेच्या वतीने मंञी नारायण राणे यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन


पिरंगूट : मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी लवळे फाटा येथे शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने जोडे मार आंदोलन करण्यात आले.यावेळी पौड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक अशोक धुमाळ यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.

     यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सत्यवान उभे, जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे,माजी सभापती बाळासाहेब पवळे,उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ,महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका संगीता पवळे,तालुकाप्रमुख सचिन खैरे यांनी यावेळी शिवसेना मुळशी तालुक्याच्या वतीने निषेध व्यक्त केला.यावेळी शिवसहकार सेनेचे संघटक ज्ञानेश्वर डफळ,महिला संघटीका ज्योती चांदेरे,संतोष तोंडे,सुरेश मारणे,गोविंद सरुसे,वैभव शितोळे, दत्ता झोरे,अनिल आधवडे,हनुमंत सुर्वे,माऊली केमसे,मयूर भांडे,गणेश भोईणे,गजानन हिरवे,किसन सुतार ,मिथुन खिलारी, शंकर शेलार,मुकेश लोयरे,नितीन लोयरे व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top