पौड : राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणारे केंद्रीय मंञी नारायण राणे यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या माजी जिल्हा संघटीका स्वाती ढमाले यांनी गुन्हा दाखल करून अटक करावी म्हणून पौड पोलिस स्टेशनला निवेदन दिले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री पद हे संविधानाने दिलेले पद आहे.या पदाचा अपमान करणे तसेच निंदा करणे गुन्हा आहे.राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात केंद्रीय मंञी नारायण राणे यांनी अतिशय निंदनीय वक्तव्य केलेले आहे.
महाराष्ट्राला कार्यतत्पर व प्रगतीकडे नेणारे मुख्यमंत्री लाभले असून मंञी नारायण राणे यांचे वक्तव्य निंदनीय आहे. तरी नारायण राणे यांच्यावर कलम ५०० प्रमाणे अब्रुनुकसानीचा दावा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही स्वाती ढमाले यांनी केली आहे. यावेळी शिवसेनेच्या राणी शिंदे, उर्मिला शिंदे, वृषाली शिंदे उपस्थित होत्या.