logo
add image
add image
Blog single photo

पीएमआरडीएच्या विकास आराखड्यातील झोन दुरूस्त करण्यात यावेत.पीएमआरडीए आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे मागणी


पौड : २०२१ ते २०४१ चा विकास आराखडा पीएमआरडीए कडून नुकताच प्रसिद्ध करण्यात आला आहे.यामध्ये मुळशी तालुक्यातील गावामध्ये टाकण्यात आलेले झोन काही ठिकाणी  चुकीचे असून आराखड्यातील झोन दुरूस्त करण्यात याव्येत अशी मागणी पीएमआरडीएचे आयुक्त सुहास दिवसे यांच्याकडे शिवसेना मुळशी तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

         या विकास आराखड्यात मुळशी तालुक्यातील सर्वच गावांचा समावेश करण्यात आलेला आहे.गाव निहाय,सर्व्हे/गट निहाय झोन टाकण्यात आलेले आहेत.काही ठिकाणी चुकीचे झोनिंग झालेले आहे.तर काही ठिकाणी शेती झोन पडणे आवश्यक असताना वनीकरण किंवा खाजगी वनीकरण झोन टाकण्यात आला आहे.काही जागांवर वनीकरण झोन होता.माञ या आराखड्यात हिल टाँप,हिल स्लोप झोन टाकला आहे.हा झोन टाकताना अतितीव्र उताराच्या जागा गृहित धरणे आवश्यक होते.कमी उताराच्या जागेवर हिल स्लोप झोन टाकला गेला आहे.तसेच ज्या जागा कधीही खाजगी वनीकरणात नव्हत्या त्यांना खाजगी वनीकरण झोन टाकण्यात आला आहे.

         मुळशी धरण भागातील ज्या ७/१२ त पिक पाहणी मध्ये शेतीचा उल्लेख आहे अशा जागा शेती झोन मध्ये घेण्यात याव्यात.हायवे लगतच्या जागावरील खाजगी वनीकरण काढण्यात यावे. काही ठिकाणी पूर्वी शेती झोन होता.परंतु या प्रारूप आराखड्यात त्या सर्व जागा वनीकरण झोन व ग्रीन झोन मध्ये घेतल्या गेलेल्या आहेत.यामध्ये शेतकऱ्यांचा कोणताही फायदा होणार नसून नुकसानच होणार आहे.तरी सदर जागा शेती झोनमध्ये ठेवाव्यात किंवा रहिवासी झोन मध्ये घेण्यात याव्यात. 

         या प्रारूप विकास आराखड्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करून जनतेला मार्गदर्शन करावे व विकास आराखड्याच्या हरकती व सूचनांसाठी मुदतवाढ मिळावी अशा विविध मागण्या शिवसेना तालुका प्रमुख सचिन खैरे यांनी निवेदनाव्दारे केलेल्या आहेत.यावेळी उपजिल्हाप्रमुख संतोष मोहोळ,विद्यार्थी सेना सरचिटणीस संतोष लोयरे,प्रसिध्दीप्रमुख किसन सुतार,नितीन लोयरे उपस्थित होते.

add image
add image

Leave Comments

Top